नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग कशी सुरु करावी ? । how to start trading in marathi या विषयी माहिती घेणार आहोत.
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यास आपण इच्छुक आहात, परंतु स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी सुरु करावी ? याची खरी माहिती नसते. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग चालू करावयाची आहे आणि चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग चालू केली तर आपण जास्त काळ स्टॉक मार्केटमध्ये टिकू शकणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग योग्य पद्धतीने करावयाची असेल तर, तुम्हाला या पोस्टमध्ये स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु करण्याची खरी व अचूक माहिती मिळणार आहे.
स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग कशी सुरु करावी ?। how to start trading in marathi
स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. इन्व्हेस्टमेंट हि लॉँगटर्म चा विचार करून कंपनीचे स्टॉक खरेदी केले जातात. ‘ट्रेडिंग म्हणजे व्यापार करणे’ स्टॉक मार्केट मध्ये व्यापार करणे म्हणजे ट्रेंडिग, यामध्ये कमी किमतीमध्ये एखादे कंपनीचे स्टॉक विकत घेणे व त्या स्टॉकची प्राईस वाढला कि ते स्टॉक सेल करून प्रॉफिट बुक करणे. यालाच आपण ट्रेडिंग करणे असे म्हणतो. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग stock मध्ये, Option किंवा futures मध्ये सुद्धा केली जाते. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, स्कालपिंग, डिलिव्हरी ट्रेडिंग असे वेगवेगळे प्रकार आहेत. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरुवात करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची माहिती असणे गरजेचे असते व त्या गोष्टी कशा अमलात आणाव्या याची सखोल माहिती खालील मुद्यांच्या आधारे दिलेली आहे.
1. स्टॉक मार्केट विषयी माइंडसेट तयार करा|create a mindset about the stock market
नवीन ट्रेडरने स्टॉक मार्केटच्या ट्रेडिंगला एखाद्या बिजनेस प्रमाणे समजावे. स्टॉक मार्केटला बिजनेसच्या नजरेने पाहावे. स्टॉक मार्केट कोणताही सट्टा बाजार नाही. स्टॉक मार्केटला गॅम्बलिंग समजू नये, किंवा स्टॉक मार्केटमध्ये कधीही नशिबावर अवलंबून राहू नये. स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करणे हि एक कला म्हणजे स्किल आहे. या ट्रेडिंगच्या स्किलला दिवसेंदिवस अनुभवाच्या व प्रॅक्टिसच्या जोरावर वाढवण्याचा प्रयत्न करावा. स्टॉक मार्केट मध्ये डेली म्हणजे दररोज प्रॉफिट होईल हि मानसिकता चुकीची आहे.
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करून मी माझ्या कुटुंबाची आर्थिक गरजा पूर्ण करेल व स्टॉक मार्केटमध्ये कमावलेल्या पैसे वरच मी घर चालवेल हे विचार चुकीचे आहेत. स्टॉक मार्केट मध्ये कधीही कर्ज घेऊन किंवा कोणाकडून उधार पैसे घेऊन ट्रेडिंग सुरू करू नये, नाहीतर तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असते. स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग सुरु करण्यासाठी आपली जॉब, नोकरी, किंवा व्यवसाय बंद करू नये. अशा प्रकारे आपले ट्रेडिंग सुरु करण्या अगोदर आपला माईंडसेट बनवावा लागेल व या गोष्टीची काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
2. ट्रेडिंगसाठी लागणारे डिव्हाईस | devices for trading
स्टॉक मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी डिव्हाईसची गरज असते. मग तो मोबाईल असो, लॅपटॉप असो, कॉम्प्युटर असो किंवा टॅबलेट असो कोणत्यान कोणत्या डिव्हाईसची गरज तर लागतेच. हमखास नवीन ट्रेडरकडुन विचारला जाणारा प्रश्न म्हणजे असा कि ‘मोबाईलचा वापर करून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो का ? हो, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग तुम्ही एका स्मार्ट मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता. परंतु मोबाईल वेळेवेळी हँग किंवा ल्याग करू नये. मोबाईल 4 जी.बी. चा असेल तर चालेल परंतु त्याचे प्रोसेसर चांगले असावे.
मग स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी बहुतेक ट्रेडर लॅपटॉपला महत्व का देतात. कारण लॅपटॉप व मोबाईल मध्ये खूप फरक पहावयास मिळतो. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये ट्रेडिंग करणे सोपे जाते, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये मोबाईल पेक्षा जास्त मोठी स्क्रीन भेटते ज्यामध्ये टेक्निकल एनालिसिस व बॅक टेस्टिंग करणे सोपे जाते. टेक्निकल एनालिसिस करण्यासाठी चार्टवर टूल चा वापर करावा लागतो, परंतु मोबाईलच्या छोट्या स्क्रीन वर टूल लावणे व टेक्निकल एनालिसिस करणे कठीण जाते परंतु लॅपटॉप मध्ये हे काम करण्यासाठी सोपे जाते.
लॅपटॉप मध्ये तुम्हाला मल्टिपल स्क्रीन चे ऑपशन मिळते. लॅपटॉपच्या विंडो मध्ये तुम्ही मल्टिपल चार्ट उघडून एनालिसिस करू शकता परंतु मोबाईल मध्ये हे ऑपशन तुम्हाला मिळणार नाही. लॅपटॉप मध्ये टॅबचे ऑपशन मिळते. टॅबचा वापर करून सहज तुम्ही एका पेक्षा जास्त ऍप मध्ये स्विच करू शकता परंतु मोबाईल मध्ये हे काम करण्यास खूप वेळ लागतो. तसेच स्कालपिंग ट्रेडिंग मोबाईल मध्ये करणे खूप अवघड जाते, कारण स्कालपिंग मध्ये डिसिजन लवकर घ्यावे लागते व ऑर्डर पण लवकर एक्सक्यूट कराव्या लागतात हे काम मोबाईलमध्ये करणे शक्य नाही.
तसेच मोबाईलवर तुम्हाला Futures & Option ट्रेडिंग करणे खूप अवघड जाते. F & O मध्ये ट्रेडिंग करते वेळी चार्ट पण पहावा लागतो, चार्टवर वेग वेगळे टूल वापरून टेक्निकल एनालिसिस करावा लागतो, Option chain पाहून डेटा समजून ट्रेड घ्यावे लागतात आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये ऑर्डर, स्टॉप लॉस लावावा लागतो. हे संपूर्ण काम एकाच मोबाईलवर करणे अशक्य आहे आणि जर केले तरी तुमच्या कडून मिस्टेक होऊन लॉस होण्याची जास्त संभावना असते.
तसेच तुम्ही जर जास्त ट्रेडिंग करत नसाल किंवा तुमच्याकडे बजेट नसेल तर तुम्ही मोबाईलने ट्रेडिंग करू शकता परंतु ट्रेडिंगसाठी लॅपटॉप असणे खूप गरजेचे आहे. परंतु ज्यांचे एवढे बजेट नसेल तर, 20 ते 25 हजारा मध्ये एखादा सेकंड हॅन्ड लॅपटॉप पण ट्रेडिंगसाठी वापरू शकता. परंतु त्याचे बॅटरी बॅकअप किमान 4 ते 5 तास तरी असावे. कारण काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी चा प्रॉब्लम असेल तर. जर तुम्ही ऍडव्हान्स ट्रेडिंग करत जर असाल आंणि तुमच्याकडे बजेट असेल तर किमान 40 ते 45 हजारा मध्ये एक चांगला लॅपटॉप येतो ट्रेडिंग करण्यासाठी. ट्रेडिंगसाठी Apple चा लॅपटॉपच असावा का ? असे पण नाही. ज्यांचे बजेट असेल ते विकत घेतात.
मोबाईल पेक्षा लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्प्युटरवर ट्रेडिंग करणे सोपे होऊ शकते. लॅपटॉप मध्ये जास्त मोठी स्क्रिन दिसते जे तुम्हाला चार्ट पाहणे, टेक्निकल एनालिसिस करणे, चार्टवर वेगवेगळे टूलचा वापर करणे सोपे होते. लॅपटॉप मध्ये एका पेक्षा तुम्ही जास्त टॅबमध्ये ट्रेडिंग अकाउंट, चार्ट वेबसाईट, Option chain किंवा इत्तर वेबसाईट जी कि तुम्हाला ट्रेडिंगसाठी मदत करेल अशा वेबसाईट एकाच वेळी पाहू शकता जेणे करून तुम्ही ट्रेडिंग करते वेळी जास्तीत जास्त डेटा मिळवता येईल व तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे सोपे होईल.
कॉम्प्युटर तुम्हाला प्रवासामध्ये किंवा बाहेर ठिकाणी घेऊन जाणे कठीण आहे. परंतु लॅपटॉप जर तुम्हाला कॅरी करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही एखादा टॅबलेट खरेदी करू शकता. परंतु स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी टॅबलेट असावाच असे पण काही नाही. तुम्ही लॅपटॉपवर चार्ट पाहून मोबाईलवर ऑर्डर लावू शकता. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये डिव्हाईस चॉईस करणे खूप महत्वाचे आहे किंवा कोणता डिव्हाईस तुमच्यासाठी ट्रेडिंग करण्यासाठी चांगला हे तुम्ही ठरवूनच निर्णय घेऊ शकता.
3. इंटरनेट स्पीड । Internet Speed
स्टॉक मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी फास्ट इंटरनेटची गरज असते. जर तुमच्याकडे वायफायची सुविधा असेल तर सर्वात चांगले, परंतु वायफायची सुविधा जर नसेल तर तुम्ही मोबाईलचा इंटरनेट डेटा वापरू शकता. आजकाल इंटरनेट स्पीड हि 4 जी.बी. व 5 जी.बी. पर्यन्त सर्व इंटरनेट डेटा कंपन्या देतातच. परंतु ट्रेडिंग करण्याचे ठिकाण असे निवडा कि तेथे इंटरनेट स्पीड खूप जास्त असावी. ट्रेडिंगच्या दरम्यान इंटरनेट बंद पडू नये किंवा त्याची स्पीड कमी होऊ नये.
4. ट्रेडिंग अकाउंट । Trading Account
स्टॉक मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटची गरज तर लागेलच. खूप साऱ्या बँका तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट सोबत डिमॅट अकाउंटची सुविधा देतात. परंतु त्यांचे चार्जेस खूप जास्त असतात. याला आपण फुल सर्विस ब्रोकर असे म्हणतो. तुम्ही फुल सर्विस ब्रोकर कडे पण अकाउंट उघडून ट्रेडिंग सूर करू शकता.
दुसरे म्हणजे डिस्काउंट ब्रोकर. डिस्काउंट ब्रोकर हे आपल्याला ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग फी कमी घेतात. जसे कि ZERODHA, Angel One, Upstox हे सर्व डिस्काउंट ब्रोकर आहेत. हे पण ट्रेडिंग अकाउंट सोबत डिमॅट अकाउंटची सुविधा देतात.
5. ट्रेडिंग फंड । Trading Fund
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडिंग फंडची गरज तर असतेच. ट्रेडिंग फंड शिवाय आपण ट्रेडिंग करू शकणार नाहीत. परंतु जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल आणि ट्रेडिंग करू इच्छित असाल तर किमान 5 ते 6 महिने नवीन ट्रेडरने पेपर ट्रेडिंग करावी. पेपर ट्रेडिंग करत करत सपोर्ट अँड रेसिडेंट, कॅन्डलस्टिक टाईप, व्हालूम, टेक्निकल एनालिसिस, प्राईझ एक्शन याची माहिती घेऊन शिकावे. पेपर ट्रेडिंग करण्यासाठी Neostox.com हि वेबसाईट मध्ये फ्री मध्ये अकाउंट उघडून पेपर ट्रेडिंग करू शकता. जो पर्यन्त तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पूर्ण कॉन्फिडन्स येत नाही तो प्रयन्त ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रेडिंग फंड जमा करून ट्रेडिंग करणे टाळावे.
स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी टेक्निकल एनालिसिस, प्राईझ एक्शन हे शिकणे तर जरुरी आहेच परंतु, ट्रेडिंग सायकोलॉजी, इमोशन कंट्रोल, ट्रेडिंग डिसिप्लेन हे सर्व जाणून घेण्यासाठी व शिकण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग फंडचा वापर करून लाईव्ह ट्रेडिंग करून शिकावी लागेल. सुरुवातील इक्विटी म्हणजे स्टॉक मध्येच ट्रेडिंग करावी, ज्यामध्ये 5 हजार ते 20 हजार प्रयन्त ट्रेडिंग फंड वापरावा. सुरुवातीला काही लॉस होतील, प्रॉफिट पण होईल जोपर्यंत एका महिन्यामध्ये तुम्ही प्रॉफीटमध्ये राहणार नाहीत तो पर्यन्त ट्रेडिंग फंड वाढवू नये.
Futures & Option मध्ये ट्रेडिंग करण्याचा विचार जर करत असाल तर अगोदर काही दिवस ट्रेडिंग स्किल वाढवावी. जेव्हा तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स येईल तेव्हाच Futures & Option मध्ये ट्रेडिंग करण्यास सुरुवात करावी. Futures & Option मध्ये ट्रेडिंग करणे म्हणजे हाय लेव्हलची ट्रेडिंग करणे होय. Futures & Option मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी 15 हजार ते 30 हजार प्रयन्त ट्रेडिंग फंड वापरावा. पुढे काही महिने जर तुम्ही प्रॉफिट मध्ये महिना निघत असेल तर तुम्ही ट्रेडिंग फंड वाढवू शकता.
6. ट्रेडिंग चार्ट । Trading Chart
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडिंग चार्टची आवश्यकता असते. फुल सर्विस ब्रोकर असो की डिस्काउंट ब्रोकर असो प्रत्येक ब्रोकर आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर किंवा ऐप मध्ये ट्रेडिंग चार्ट उपलब्ध करून देतात. परंतु त्या चार्टमधे काही असे ऍडव्हान्स फिचर मिळत नाहीत. त्यामुळे बहुतेक ट्रेडर हे TradingView.com या टूलचा वापर करतात. यांचा ऐप आणि वेबसाईट दोन्हीही उपलब्ध आहेत.
TradingView.com मध्ये चांगले फिचर आहेत. फ्री मध्ये तुम्हाला ट्रेडिंग चार्टवर टेक्निकल एनालिसिस चांगल्या प्रकारे करू शकतात. फ्री मध्ये टूल आणि इंडिकेटर वापरण्याची परवानगी देतात जी कि ट्रेडिंग करण्यासाठी पुरेशी आहे. त्यांचा पेड प्लान पण आहे, यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्स फिचर वापरण्याची परवानगी देतात ज्यामध्ये मल्टिपल चार्ट व तीन पेक्षा जास्त इंडिकेटर वापरण्यास परवानगी मिळते. यामध्येत तुम्हाला वेगवेगळे चार्ट जसे कि, लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट असे वेगवेगळे चार्ट उपलब्ध असतात.
7. स्टॉक मार्केट विषयी शिकत राहा.। Keep Learning about the stock market
स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याच्या अगोदर व ट्रेडिंग करत असताना सुद्धा ट्रेडरसाठी महत्वाची गोस्ट म्हणजे, स्टॉक मार्केटला समजणे व शिकणे होय. स्टॉक मार्केट विषयी दररोज काहीना काही शिकत राहा, लर्निंग सोडू नका पहिल्यांदा तुम्हाला बेसिक नॉलेज घ्यावे लागणार. यामध्ये तुम्हाला ऐप मधील किंवा वेबसाईट वर Buy Order, Sell order, stop loss, target, limit order, market order, exit, trailing, MIS, CNC, NRML, GTT याची सविस्तर माहिती घ्यावी.
दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकल एनालिसिस शिका ज्यामध्येत Supports & Resistance, Candlestick Patterns, Chart Patterns, Break Out, Fake Break Out, Pull Back, Zone, Retest तसेच ट्रेडिंग चार्टमधे काही टूल आहेत जसे की , Trend Line, Horizontal Line, Rectangle, Scale, Long Position, Short Position, Fibonacci Retracement यांचा केंव्हा आणि कधी वापर करावा ? आणि कशासाठी वापर करावा ? याची माहिती घ्यावी. तसेच काही इंडिकेटर आहेत जसे कि, Moving Average, Volume, RSI, यांच्या विषयी संपूर्ण माहित घ्यावी.
स्टॉक मार्केट मध्ये शिकण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सायकॉलॉजी, रिस्क मॅनेजमेंट आणि इमोशन वर कण्ट्रोल कसे करावे या विषयी संपूर्ण माहिती घेऊन त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. स्टॉक मार्केट मध्ये या गोष्टीला खूप महत्व आहे.
8. ट्रेडिंग रुल्स अँड डिसिप्लेन । Trading Rules & Discipline
स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करते वेळी काही चुका होत राहतात. अशा चुकांची एक यादी करून त्या चुका आपल्याकडून परत होणार तर नाही ना याची काळजी घ्यावी. ट्रेडिंगचे काही रुल्स आहेत या रूल्सचे अनुशासन व शिस्तीने पालन करावे. जो प्रयन्त कोणताही ट्रेडर हा रुल्स आणि डिसीप्लेन चा काटेकोरपणे पालन करत नाही तो प्रयन्त एक चांगला यशस्वी ट्रेडर बनू शकत नाही.
9. एक नोटबुक बनवा । Make a Notebook
स्टॉक मार्केट मध्ये काम करते वेळी काही गोष्टी माहित होतात. काही रुल्स, काही महत्वाच्या गोष्टी, काही महत्वाचे मुद्दे, टिप्स याची नोंद आपण आपल्या एका नोटबुक मध्ये लिहण्याची सवय ठेवावी. एक नोटबुक तयार करून त्यामध्ये महत्वाच्या गोष्टीची नोंद करणे हि चांगली सवय आहे आणि तयार केलेले नोटबुक दिवसातून एकदा तरी निवांत वेळी त्याचे वाचन करावे.
10. वेळेवेळी ट्रेडिंग पासून सुट्टी व विश्रांती घ्यावी.|Take time off and rest from trading
स्टॉक मार्केट मध्ये आपण नवीन असतात. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे हे खूप ट्रेसफुल्ल काम आहे. काम करताना डोक्यावर ताण येतो. त्यामुळे ट्रेडिंगच्या कामांमधून वेळेवेळी सुट्टी घ्यावी. आपल्या मित्र मंडळीत काही वेळ घालावा. आपल्या परिवाराला वेळ द्यावा. कुठेतरी फिरायला जावे. नियमित सकाळी जॉगिंग किंवा व्यायाम करावा. यॊगा मेडिटेशन केले तर खूप चांगले. त्यामुळे तुमचा थकवा व ट्रेस कमी होण्यास मदत होईल.
स्टॉक मार्केटला आठवड्यामधून शनिवार व रविवार सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी पण स्टॉक मार्केट विषयी काम करणे टाळावे. मित्र परिवार यांच्या सोबत असाल तर ट्रेडिंगच्या गोष्टी बोलणे टाळावे. ट्रेडरला आराम व विश्रांती घेणे खूप गरजेचे आहे.
निष्कर्ष :-
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग चालू करणे खूप सोपे आहे. एका ब्रोकरपाशी अकाउंट खोलले आणि त्यामध्ये फंड ऍड कला आणि झाली ट्रेडिंग सुरु. बहुतेक नवीन ट्रेडर जे कि स्टॉक मार्केट मध्ये आपले पहिले पाऊल टाकू इच्छित आहेत ते सरासरी ह्याच चुका करत आहेत. त्यांना स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी सुरू करावी ? या विषयी खरी माहिती नाही. ट्रेडिंगची सुरुवात करणे सोपे आहे, परंतु ट्रेडिंग करणे खूप अवघड आहे. त्यासाठी खूप परिश्रम व प्रॅक्टिस करावी लागते आणि जसे जसे दिवसेंदिवस जातील अनुभवातूनच ट्रेडिंग करण्याची कला आत्मसात होईल.
डिस्केलमर : हा लेख फक्त एज्युकेशन व माहितीच्या उद्धेशाने लिहिलेला आहे. कोणतीही गुंतवणूक करते वेळी स्वतः माहिती घ्यावी किंवा आपल्या फाइनेंसियल सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही आपल्या मित्र, स्वकियाला शेअर करण्यास विसरू नका.
ट्रेडिंग चार्ट विषयी अधिक माहिती घेण्यासाठी टॉप 4 चार्टचे प्रकार या पोस्टला जरूर भेट द्या.
धन्यवाद !
Khoop Chhan Mahiti aahe
aapn deleli mahiti navin lokansathi khup upuakt aahe.